IMD ने दिलेल्या अंदाजनुसार, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यात ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी महापूर आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुध्दा वाहून गेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने शहरात पाणीच पाणी झाले आहे.
मागील चार दिवसापासून कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात मुसळधार पडत आहे. सातारा मधील कोयना मध्ये मागील काही दिवसापासून तीव्र गतीने जलसाठा वाढत आहे. भारतीय हवामान विभागाने ( india meteorological department ) दिलेल्या अंदाजनुसार, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांनसाठी २६ जुलै पर्यंत ऑरेंज अर्लट जारी केला आहे. तसेच या दोन जिल्ह्यात सलग ५ दिवस पावसाचा इशार आहे. तसेच सांगली जिल्ह्यात सुध्दा पुढील पाच दिवसात सर्वत्र क्षेत्रात मुसळधार पाऊस पडणार आहे.