
IMD : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार आहे. पुढील काही दिवसात अनेक जिल्ह्यात परतीचा पावसाची सुरुवात होईल, परंतू पावसाचा जोर हा कमीच राहणार आहे. हवामान खात्यानुसार कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तूरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्रात हवामान कोरडे होणार | IMD
गोवा ते कोकण पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय होता, परंतू कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्रात येता येता त्याची तीव्रता कमी झालेली पाहयला मिळाली आहे. याच कारणामुळे मध्य महाराष्ट्रात आणि कोकण भागात पावसाचा जोर ओसरणार आहे. तूरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण असेल तर तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम प्रकारचा पडू शकतो.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तूरळक ठिकाणी आज पाऊस पडेल तसेच १० ऑक्टोबर पर्यंत परतीच्या पावसाची सुरुवात होईल.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
