IMD : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात तापमान वाढत आहे. कुठेही पावसाचे वातावरण तयार होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आत्ताच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.
पाऊस पडेल का | India Meteorological Department | IMD
सध्या राज्यात पिकांना पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची आता गरज आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. तूरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस सुद्धा पडू शकतो, असा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुंबई, कोकण, खानदेश, नासिक या परिसरात पावसाचा जोर अधिक राहील असे सांगण्यात आलेले आहे.
छत्रपती संभाजी नगर, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तूरळक ठिकाणी पाऊस पडेल तसेच उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत राहणार आहे. 18 ऑक्टोंबर पासून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण मराठवाड्यात आणि कोकण भागात पाहयला मिळेल कारण तूरळक ठिकाणी कारण परतीचा पाऊस हा पूर्ण पणे महाराष्ट्रातून गेलेला नाही. यामुळे मराठवाड्यात आणि कोकण भागातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान अंदाज आवडल्यास आत्ताच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर आताच सामील होऊ शकतात.
NAMO Shetkari Yojana : 2 हजार रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार