IMD : भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) दिलेल्या अंदाजनुसार, पुढील १२ दिवस पावसाचा खंड महाराष्ट्रात पाहयला मिळणार नाही. पूर्व विदर्भापासून महाराष्ट्रात पावसाची सुरुवात झाली असून तीन ते चार दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस पडणार आहे.
भारतीय हवामान अंदाज | India Meteorological Department
महाराष्ट्रातील संपूर्ण भागात पुढील 12 दिवसात भाग बदलत अति मुसळधार पाऊस होणार आहे. राज्यात अनुकूल वातावरण असल्यामुळे पुढील 24 तासात विविध भागात आज पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने आज महाराष्ट्रातील काही भागांना येलो अर्लट तर ऑरेंज अर्लट सुध्दा जारी केला आहे. तसेच या पावसात ओढे नाले वाहतील, बंधारे भरतील तसेच धरणातील जलसाठा सुध्दा वाढणार असल्याची माहिती दिली आहे.
Panjab Dakh : 1 ऑगस्ट पर्यंत हवामान अंदाज जारी
आजचा हवामान अंदाज | IMD
विदर्भात आणि कोकण भागात भाग बदलत अति मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे आयएमडीने ( IMD ) ऑरेंज अर्लट जारी केला आहे. खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी ढगाळ वातावरण असणार परंतू बहूतांश भागात आज 19 जुलै रोजी मुसळधार पाऊस तसेच उर्वरित भागात रिमझिम पाऊस पडू शकतो.
आज पाऊस पडणार का ?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तासात ठाणे, रायगड, पालघर, पुणे, रत्नागिरी, सातारा या सहा जिल्ह्यात वीजासह जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे.