IMD : गेल्या काही दिवसापासून राज्यात मान्सूनने राज्यात चांगलाच जोर वाढवला आहे. महाराष्ट्रात नव्हे देशभरात मान्सूनचा जोर पुढील पाच दिवसासाठी कायम असणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने ( IMD ) वर्तवला आहे.
IMD : 30 June पर्यंत या जिल्ह्यात पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड,नाशिक, पालघर या जिल्ह्यात पावसाचा अति जोर असणार त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
अमरावती, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अकोला, वर्धा, नागपूर, या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला नाही.
चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, या जिल्ह्यात सुध्दा वीजासह अति मुसळधार पाऊस होणार असल्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात सुध्दा पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम पाहयला मिळणार आहे. महाराष्ट्रात घाट क्षेत्रात तसेच कोकण भागात पुढील पाच दिवस भाग बदलत पाऊस असणार आहे.
आयएमडी ( IMD ) भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच दिवसात राज्यात मान्सूनचा प्रभाव चांगला आहे. महाराष्ट्रातील उर्वरित भागात लवकरच मान्सून पोहणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, मध्य महाराष्ट्रात, कोकण तसेच विदर्भात अति मुसळधार पाऊस होणार असल्यामुळे धोका सुध्दा निर्माण होऊ शकतो.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.