IMD’S : यावर्षी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन उशीर झाले, त्यामुळे बहूतांश भागात पेरण्या आणि लागवड हे मागे पुढे झाले आहेत. खरतर पाहिल तर यावर्षी महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कमी झाला यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात महाराष्ट्रातील बहूतांश भागात कमी अधिक पाऊस पडणार आहे.
आजचा हवामान अंदाज | IMD | Weather
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अनेक भागात तूरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यावेळेस ऑक्टोबर महिन्यात पहिल्याच आठवड्यात बहूतांश भागात अतिवृष्टी सारख पाडणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या महिती नुसार, ऑक्टोबर महिन्यात पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात राज्यात पावसासाठी पोषक वातावरण राहणार असून बहूतांश भागात कमी वेळेत जोरदार वाऱ्यासह मुळसळधार पाऊस पडणार आहे. परतीच्या पावसाने सर्व शेतकरी सुखावेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
Agriculture Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विविध ठिकाणी राज्यात १९ ऑक्टोबर पर्यंत परतीचा पाऊस पडत राहणार आहे. पुढील २४ तासानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू शकतो. हवामान खात्यानुसार, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पुढील काही तासानंतर पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच मराठवाड्यात पुढील दोन दिवसात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार त्यानंतर २४ तासात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.
आज रात्री पाऊस पडणार ?
IMD : पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.