IMD : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस या भागात जोरदार पाऊस पडणार

IMD : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस या भागात जोरदार पाऊस पडणार
IMD : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस या भागात जोरदार पाऊस पडणार

 

IMD : गोवासह महाराष्ट्रातील कोकण भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार आहे. मागील २४ तासात गुजरात मध्ये अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. आज गुजरात आणि महाराष्ट्रातील कोकण भाग आणि घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस होणार असा गंभीर इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

खालापूर, कर्जत, पेण, मंडणगड, माथेरान या ठिकाणी मागील २४ तासात मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच पुढील २४ तासात नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिला आहे.

गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर अधिक पाहयला मिळणार आहे. विदर्भात पुढील ५ जुलै पर्यंत बहूतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने माहिती दिली आहे.

हरियाणा, पंजाब, उत्तराखंड पुढील दोन दिवस या राज्यात पाऊस होणार तसेच राज‍स्थान आणि उत्तरप्रदेश मध्ये अति जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान‍ विभागाने दिला आहे.

आयएमडीच्या माहितीनुसार महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, या पाच राज्यात सलग 5 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, केरळ आणि कर्नाटक मध्ये ३ जुलै आणि ४ जुलै रोजी मुसळधार पाऊस होणार आहे.

हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Drought : 22 वर्षानंतर राज्यात सर्वात कमी पाऊस पडला
Drought : 22 वर्षानंतर राज्यात सर्वात कमी पाऊस पडला

Leave a Comment