IMD : यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. मुख्य म्हणजे राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. मागील काही दिवसापासून मध्य महाराष्ट्रात, विदर्भात आणि कोकण भागात पावसाच्या सरी तर काही भागात अति मुसळधार पाऊस पडत आहे. काल पासून राज्यातील विविध ठिकाणी पावसाच्या सरी पडत होत्या परंतू आज बहूतांश भागात अति मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसेच कोकण भागात आणि मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १७ जुलै रोजी हवामान अंदाज जारी करत म्हटले की, राज्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस होऊ शकतो.
मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पुढील २४ तासात पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे विविध ठिकाणी वीजासह अतिवृष्टी सारखा पाऊस पडू शकतो तसेच उर्वरित भागात हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पडू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुढील काही दिवसात चक्रवादळ तयार होण्याची शक्यता आहे.
IMD च्या मते नुसार राज्यात आज रात्री पाऊस पडणार ?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात, कोकण भागात तसेच खानदेश मध्ये सुध्दा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार तसेच उर्वरित भागात हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाच्या मते, मध्य महाराष्ट्रात आणि कोकण भागात तसेच विदर्भातील काही आज रात्री अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
IMD : 13 जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस येथे पहा