IMD : नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे अपडेट, मान्सूनसाठी पुढील दोन दिवस पोषक वातावरण नसल्यामुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास थांबला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मागील दोन दिवसापासून मान्सूनसाठी पोषक वातावरण नसल्यामुळे राज्यात मान्सूनचा प्रवास हा थांबलेला आहे. येत्या सोमवारी भारतात मान्सून हा संपूर्णपणे काढता पाय घेईल तसेच उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशाच्या काही भागात पुन्हा एकदा मान्सून परतला होता. बिहार, झारखंड, तेलंगणा, कर्नाटक तसेच छत्तीसगड या राज्यातून मान्सूनने माघारी घेतलेली आहे. तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात संपूर्णपणे माणसांनी माघारी घेतलेली आहे
IMD : पुढील 24 तासात अति मुसळधार पावसाचा अंदाज
पुढील 5 दिवस वातावरण कसे राहणार | IMD
तसेच महाराष्ट्रातील कोकणसह सिंधुदुर्ग, विदर्भ आणि गडचिरोली या भागात तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काम रामागुंडम, बिजापूर या ठिकाणावरून मान्सून परतीचा प्रवास करत आहे. भारतातील अनेक राज्यात तुळरक भागातील अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडत आहे. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय या चार राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण राहते. तसेच हिमालयचल व त्याच्या आजूबाजूस पावसासाठी पोषक वातावरण राहत आहे. महाराष्ट्रात उन्हाचा पारा हा सातत्याने वाढत राहिल. तसेच पुढील काही दिवस आणखी दिवस तापमानचा पारा अशाच प्रकारे वाढत जाईल मात्र रात्री गारवा निर्माण होणार आहे. दुपारी उन्हाचा चटका तसेच रात्री गारवा राज्यात अश्या प्रकारे वातावरण राहिल. पुढील पाच दिवस राज्यात कोरडे हवामान राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.