
IMD : आज पाच जिल्ह्यात विविध ठिकाणी कमी वेळेत अधिक वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्यामुळे जनजीवन हे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या भागात दरड कोसळणे, झाडे पडणे तसेच पुर वाहणे अशा प्रकारच्या घटना होणार असल्यामुळे हवामान खात्याने आज नागरिकांना सर्तकतेचा इशारा जारी केला आहे.
आज पाऊस पडणार का ? | IMD
हवामान खात्यानुसार, राज्यात पुढील काही तासात राज्यातील विविध भागात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी तसेच घाट क्षेत्रात मेघगर्जना होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कमी वेळेत अधिक पाऊस पडणार असल्यामुळे जनजीवन हे विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी तसेच वातावरण पाहूनच घराच्या बहेर पडावे, शक्यतो प्रवास करणे टाळावे असे अहवान हवामान विभागाने आणि प्रशासनाने केले आहे.
IMD : पुढील काही तासात 4 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
अनेक भागात मुसळधार पावसामुळे झाल्यामुळे बळीराजा हा सुखावला आहे. परतीच्या पावसामुळे धरणांची पातळी हि वाढण्याची शक्यता दाट आहे. भारतीय हवामान विभागनुसार, मुंबई १० ऑक्टोबर रोजी परतीच्या पावसाची सुरुवात होणार आहे. ठाणे आणि नांदेड या दोन जिल्ह्यात चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे. तसेच सांगली मध्ये ४४ टक्के पेक्षा अधिक कमी पावसाची नोंद झाली आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
