IMD : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात २३ जुन पासून पावसाची चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. परंतू राज्यात भाग बदलत पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे आगमन झाले नाही तसेच पाऊस झाला तर पुरेसा पाऊस पडला नाही. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पेरण्या खुंळबल्या आहेत.
आजचा हवामान अंदाज | Monsoon Update Today
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध भागात मुसळधार पाऊस पडला आहे. मागील आठवड्यापासून मान्सूनची सुरुवात झाल्यापासून अजूनहि महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला नाही.
प्रादेशिक हवामान विभागाने आज १ जुलै रोजी ८ जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट जारी केला आहे. तसेच आज पासून पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. शनिवार ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, पुणे या भागात चांगल्या प्रकारे पावसाची हजेरी लागणार आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी दमदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रात विखुरलेला पावसाची शक्यता आहे.