IMD : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सरासर पावसाचे प्रमाण कमी आहे. पण इतर राज्यात मान्सूनने पावसाने थैमान घातले आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान मध्ये मागील २४ तासात पावसाने थैमान घातले. ४० वर्षानंतर नवीन दिल्लीत अति मुसळधार पाऊस झाला त्यामुळे सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेश मध्ये आज पुन्हा रेड अर्लट भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
India Meteorological Department | IMD
भारतीय हवामान खात्यानुसार, हिमाचल प्रदेश मध्ये पुन्हा एकदा १३ जुलै पासून पावसाचे थैमान पाहयला मिळणार आहे. उत्तराखंड मध्ये सुध्दा अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजवीन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरखंड मध्ये पुढील 5 दिवस 15 जुलै पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हि गंभीर बाब लक्षात घेत तेथील राज्य सरकारने कॉलेज शाळा पुढील पाच दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढणार
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, ( India Meteorological Department ) १३ जुलै पर्यंत कोकण भागात पावसाचा जोर कमी होणार, त्यापुढे १५ जुलै पर्यंत पुन्हा एकदा कोकण भागात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण भागात तसेच मराठवाडा विदर्भ या भागात १५ जुलै पर्यंत विविध ठिकाणी अति मुसळधार पाऊस होऊ शकतो यामुळे आयएमडीने येलो अर्लट जारी केला आहे. जाणंकराच्या मते, १३ जुलै पर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी होणार तसेच त्यानंतर पुन्हा एकदा मान्सून चांगल्या प्रकारे सक्रीय राहणार आहे.
Why are you giving such wrong news. In Maharashtra, only Mumbai and Thane district has more than 100 % mansoon rain. Remaining district has less than 20 to 80 % of rain ( Source – Today’s news in Dainik Pudhari ). I am from Karad where there is no rain at all.