IMD : 24 तासात 13 जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार

IMD : 24 तासात 13 जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार
IMD : 24 तासात 13 जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार

 

IMD : भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) दिलेल्या माहितीनुसार, समुद्राच्या किनाऱ्यावर आज वाऱ्याचा वेग हा वाढत जाणार आहे.

भारतीय हवामान विभाग | India Meteorological Department

कोकण भागात अनुकूल परिस्थिती असल्यामुळे पुढील 24 तासात अति मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच हवामान खात्यानुसार विदर्भातील पूर्व भागात आज अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडू शकतो. खान्देश, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रासह १३ जिल्ह्यांत आज हवामान खात्याने येलो अर्लट आणि ऑरेंज अर्लट सुध्दा जारी केला आहे.

Panjab Dakh : 1 ऑगस्ट पर्यंत हवामान अंदाज जारी

लाईव्ह हवामान अंदाज | IMD

रत्नागिरी जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची सुरुवात होईल तसेच अनेक ठिकाणी अतिवृष्टी पावसाचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यात आज रात्री पासून विविध ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे. तसेच गडचिरोली मध्ये तूरळक ठिकाणी ढगाळ वातावरण असेल उर्वरित भागात पावसाच्या सरी बरसणार आहे. पुणे जिल्ह्यात सुध्दा आज हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला असून विविध भागात आज रात्री जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. मुंबईच्या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

Soybean Market : सोयाबीनच्या भावात सुधारणा होणार का ?

आज रात्री पाऊस पडणार का ?

मुंबई, सातारा, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी ( ७ ऑरेंज अर्लट ) या जिल्ह्यात पुढील २४ तासात पावसाचा जोर अधिक असणार आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे आज रात्री या भागात भाग बदलत वीजासह मुसळधार पाऊस होणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group आताच सामील होऊ शकतात.

IMD : पुढील 3 तासात 6 जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार
IMD : पुढील 3 तासात 6 जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार

Leave a Comment