IMD : 25 राज्यात वातावरणात बदल ( Climate Change ) झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, आज पासून पुढील दोन दिवस दिल्लीसह २५ राज्यात विविध भागात तूफान पाऊस होणार आहे.
25 राज्यात तूफान पाऊस होणार | India Meteorological Department
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळम, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, मेघालय, छत्तीसगड, आसाम, मध्यप्रदेश, गोवा, उत्तरखंड, काश्मीर, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, दिल्ली, राजस्थान, पंजाब, दिल्ली, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, ओडिशा, पश्चिम बंगाल या 25 राज्यात आज आणि पुढील दोन दिवस 30 जून पर्यंत भाग बदलत मुसळधार पाऊस होणार आहे.
ऑरेंज अर्लट जारी
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील कोकण विभागातील ६ जिल्ह्यात ऑरेंज अर्लट जारी केला आहे. छत्तीसगड मध्ये ६ जिल्हे आणि मध्य प्रदेश मध्ये सुध्दा ८ जिल्ह्यात सुध्दा आज भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अर्लट जारी केला आहे.
आजचा हवामान अंदाज
मुंबई, रायगड, सातारा, पुणे, नाशिक, रत्नागिरी, सहा जिल्ह्यात आज भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अर्लट जारी केला आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रात भाग बदलत अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे. जाणंकरांच्या मते, ३ जुलै पर्यंत दिल्ली पावसाचे आगमन कायम असणार तसेच महाराष्ट्रात २ जुलै पर्यंत पाऊस कायम असणार आहे.