
IMD : प्रादेशिक हवामान विभागाने तसेच भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील कोकण भागात पावसाची सरी बरसणार आहेत.
आज रात्री पाऊस पडेल का ? | IMD
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची वार्ता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात २३ जून रोजी मान्सूनसाठी अनूकुल वातावरण तयार झाल्यामुळे आज रात्री पासून कोकण भागात पावसाची सुरुवात होणार आहे. कोकण भागात २४ जून रोजी पावसाचा जोर वाढेल तसेच मध्य महाराष्ट्रात सुध्दा तूरळक ठिकाणी पावसाचे आगमन होणार आहे.
कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पोषक वातावरण तयार झाल्यामुळे आज रात्री पासून विविध भागात मोसमी पावसाचे आगमन होईल. तसेच २४ जून पासून २७ जून पर्यंत राज्यात कमी वेळेत जोरदार पाऊस होईल.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळबंल्या
महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस हा चांगल्या प्रकारे पडेल आणि पेरण्या सुध्दा होतील या आश्यावर शेतकरी आहे. पण २० दिवसा पेक्षा जास्त दिवस झाले पण महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सून हा पोहचलाच नाही, त्यामुळे मध्ये शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.
तसेच अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीची वेळ येत आहे. कृषी तज्ञांच्या मते, चांगल्याप्रकारे मोसमी पावसाची सुरुवात होत नाही तोपर्यंत लागवड करु नये.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
