Imd Weather : गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने दडी मारली होती. परंतू आज राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढत आहे. मुंबई परिसरात पाऊस पडल्याने, याचा थेट परिणाम वाहूतिकवर पाहयला मिळत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, विदर्भात आणि कोकण भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित भागात आज भाग बदलत पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४ ते ५ दिवस शेतकऱ्यांनसाठी अंत्यत महत्वाचे आहेत. कोकण भागात तूरळक ठिकाणी मेघर्गजनासह मुसळधार होणार आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भात सुध्दा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
आजचा हवामान अंदाज | Imd Weather
कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी मध्ये आज भाग बदलत मुसळधार पाऊस पडू शकतो. विदर्भातील जिल्ह्यात आज हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला आहे. तसेच मराठवाड्यात तूरळक ठिकाणी वीजासह मुसळधार पाऊस पडेल अशा प्रकारे हवामान खात्याने हवामान अंदाज जारी केला आहे.