IMD’S : भारतातील अनेक भागात पुन्हा पावसाची सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, महाराष्ट्रात सुध्दा पावसाचा जोर वाढेल तसेच अनेक शहरात जनजीवन हे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. कोकण भागात आणि इतर काही जिल्ह्यात आज दमदार पाऊस पडणार आहे.
IMD : आज रात्री 4 जिल्ह्यात मुसळधा पावसाचा इशारा
आज या भागात अतिवृष्टाचा इशारा | IMD’S
हवामान खात्यानुसार, राज्यात पुढील २४ तासात राज्यात पावसाचा जोर अधिक होणार आहे. मुंबई पुण्यात आज पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे पुढील काही तासात पावसाचा राडा होऊ शकतो. आज महाराष्ट्रातील विविध भागात तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस होत राहणार आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात विविध भागात चांगल्या प्रकारे पाऊस पडला परंतू ऑक्टोबर महिन्यात पाऊस कमी पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण खाजगी हवामान अभ्यासक यांच्या मते, राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पुरेसा पाऊस पडू शकतो.
रविवारी महाराष्ट्रातील अनेक भागात चांगल्या प्रकारे पावसाचे आगमन झाले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत ९७ टक्के पाऊस झाला परंतू ९ ते ८ जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खुपच कमी आहे. संपूर्ण भारतात आतापर्यंत ९४ टक्के पाऊस पडलेला आहे.
या जिल्ह्यात भंयकर परिस्थिती | IMD’S
हिंगोली, जालना, अमरावती, अकोला, बीड, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव या ९ जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी पाहयला मिळाले आहे. तसेच अनेक ठिकाणी पाऊस न पडल्याने पाणी टंचाई आणि पिके सुध्दा जळून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी कर्ज बाजारी होत आहे.
राज्य सरकारने, शेतकऱ्यांना पिक विमा जाहिर करुन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा तसेच सरकार तर्फे शेतकऱ्यांना आणखीन आर्थिक मदत दिली पाहिजे. तसेच भविष्यात होणारी पाणी टंचाई वर आताच सरकारने तोडगा काढावा.