India Meteorological Department : अवकाळी पावसाचे संकट

India Meteorological Department : राज्याच्या अनेक भागात कडाक्याची थंडी पडत आहे. काही भागात ढगाळ वातावरण आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात पाऊस झाला आहे.

India Meteorological Department : अवकाळी पावसाचे संकट
India Meteorological Department : अवकाळी पावसाचे संकट

 

आजचा हवामान अंदाज | India Meteorological Department

राज्याच्या अनेक भागात कडाक्याची थंडी पडत आहे. काही भागात ढगाळ वातावरण आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात पाऊस झाला. हिवाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, देश आणि राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, आज शनिवारी महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील तापमानातही घट होण्याची शक्यता आहे.काही भागात ढगाळ वातावरण आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन, खंडवा, झाबुआ, इंदूर, धार, बुरहानपूर, बरवानी, अलीराजपूर, नीमच, मंदसौर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

रतलाम, शाजापूर, आगर-माळवा, देवास, उज्जैन, अशोकनगर, दतिया, गुना, शिवपुरी, ग्वाल्हेर. विदिशा, सिहोर, राजगढ, रायसेन, भोपाळ, नर्मदापुरम, हरदा आणि बैतुलमध्ये वादळासह गारांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पंजाब, हरियाणा, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत या भागात कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group सामील होऊ शकतात.

Leave a Comment