India Meteorological Department : कोकण भाग वगळता राज्यात पावसाचे प्रमाण हे कमी राहिले आहे. भारतीय हवामान विभागाने हवामान अंदाजात म्हटले की, कोकण भागात पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण कमी राहिल तसेच मध्य महाराष्ट्रात, विदर्भात आणि मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.
आज पाऊस पडेल का ?
आयएमडीने ( IMD ) ने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काही भागात आज मुसळधार पाऊस होणार आहे. विदर्भात आणि कोकणातील रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता शक्यता असल्यामुळे येलो अर्लट दिला आहे. तसेच हवामान खात्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आज १० जुलै रोजी होणार आहे. अमरावती, बुलढाणा, अकोला, नागपूर, वर्धा, वाशिम, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊल होईल त्यामुळे हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला आहे.
15 जुलै पर्यंत राज्यात पाऊस कसा असणार ? | India Meteorological Department
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील १५ जुलै पर्यंत हलका प्रकारचा पाऊस होईल. तसेच कोकण भागात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस होणार आहे.