India Meteorological Department : 18 ऑगस्ट पासून पावसाची सुरुवात होणार

India Meteorological Department  : 18 ऑगस्ट पासून पावसाची सुरुवात होणार
India Meteorological Department  : 18 ऑगस्ट पासून पावसाची सुरुवात होणार

 

India Meteorological Department  : मुंबईच्या परिसरात पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पश्चिमी वाऱ्याचा वेग वाढला असून अरबी समुद्रात प्रवेश करत असल्यामुळे त्या क्षेत्रात पाऊस पडण्याची शक्यता दाट आहे.

भारतीय हवामान विभाग | India Meteorological Department

भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) वर्तवल्याअंदाजनुसार, सागरी किनारपट्टीवर १८ ऑगस्ट पासून हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पडू शकतो. तसेच राज्यातील अनेक भागात २५ ऑगस्ट पासून पावसाची सुरुवात चांगल्या प्रकारे होणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Electric Vehicles : असा प्रयोग करा ! मिळवा 25 हजारचे अनुदान

१८ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट पर्यंत मराठवाड्यात पावसाचा इशारा आहे. तसेच २४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत कोकण भागात जोरदार पाऊस पडू शकतो. हवामान खात्यानुसार विदर्भात १८ ऑगस्ट तारखेपासून ३१ ऑगस्ट या तारखेपर्यंत दीसआड पाऊस पडत राहणार आहे.

आज राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहयला मिळणार परंतू पुढील दोन दिवसात राज्यात पावसाच्या सरी बरसणार आहेत. मराठवाड्यात सुरुवाती पासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. मागील दोन आठवड्यापासून मराठवाड्यात तूरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसणार आहेत. आता भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) दिलेल्या अंदाजनुसार, मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनवर पुन्हा दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते. दिलेल्या अंदाजनुसार, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पुढील दोन आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके धोक्यात राहण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्यानुसार राज्यात १७ तारखेपासून राज्यातील कोकण आणि विदर्भ भागात तूरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार १९ तारखेपासून राज्यात पाऊस वाढू शकतो.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर आताच सामील होऊ शकतात.

Minister of Agriculture : शेतकऱ्यांना 1000 रुपये पर्यंत पिक विमा मिळणार
Minister of Agriculture : शेतकऱ्यांना 1000 रुपये पर्यंत पिक विमा मिळणार

Leave a Comment