
India Meteorological Department : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसान, राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार असल्यामुळे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. राज्यातील बहूतांश भागात अजूनहि पुरेसा पाऊस पडला नाही. परंतू अनेक ठिकाणी कमी वेळेत अधिक पाऊस पडल्याने तेथील जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. ठाणे, पालघर, मुंबई या ठिकाणी कमी वेळेत अधिक पाऊस पडत असल्याने तेथे वाहूतिकवर तसेच अनेक रोडवर पाणी साचले आहे. तसेच कोकणासह विदर्भात तूरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात परिस्थिती नेमकी कशी आहे ?
मुंबई, पालघर, चंद्रपूर, या भागात जोरदार पाऊस पडला आहे. सध्याच्या परिस्थितीत पावसाचा जोर कमी आहे परंतू त्या ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मध्ये पावसाचा जोर कमी परंतू अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम पाहयला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील आठ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आजचा हवामान अंदाज | India Meteorological Department
भारतीय हवामान विभागाने आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अर्लट जारी केला आहे. रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भासह पुणे, सातारा या जिल्ह्यात भाग बदलत अति मुसळधार पाऊस पडत राहणार आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

जी काही बातमी द्यायची असेल ती देताना पुनः पुनः एकच गोष्ट सांगण्यात काय शहाणपणा आहे हे कळत नाही
बातम्या अचूक व कमी शब्दात जास्त आशय असणाऱ्या असाव्यात