India Meteorological Department : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचा वेग चांगल्या प्रकारे वाढत आहे. १९ जुलै रोजी अनेक जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस झाला आहे. आज भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजपासून पुढील पाच दिवस विविध ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच आज २० जुलै रोजी हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना रेड अर्लट जारी केला आहे.
आजचा हवामान अंदाज | India Meteorological Department
हवामान खात्यानुसार पालघर आणि रायगड मध्ये आज ठिक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच २१ जुलै पर्यंत सातारा, पुणे, नाशिक भागात सुध्दा पावसाचा जोर अधिक पाहयला मिळणार आहे. मराठवाड्यात सुध्दा पुढील ४८ तासात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा आहे.
आज कुठे पाऊस पडणार ?
२० जुलै रोजी रत्नागिरी, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, रायगड, नाशिक या जिल्ह्यात विविध ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडू शकतो.