
India Meteorological Department : महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आज ढगाळ वातावरण पाहयला मिळत आहे. तसेच तूरळक ठिकाणी मागील २४ तासात सरी सुध्दा बरसल्या आहेत. हवामान खात्यानुसार राज्यात पुढील काही तासात वीजाच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस होणार आहे.
India Meteorological Department
पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून पुढील काही तासात कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन, उत्तर व पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील २४ तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे. परंतू सध्याच्या परिस्थिती बहूतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे.
पुढील २४ तासात राज्यातील कोकण भागात आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच विदर्भात आणि मराठवाड्यात तूरळक ठिकाणी साधरण पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ऑरेंज अर्लट : मध्य महाराष्ट्रात बहूतांश ठिकाणी पाऊस होईल.
येलो अर्लट : विदर्भात बहूतांश ठिकाणी साधरण पाऊस होईल.
ऑरेंज अर्लट : कोकणात बहूतांश ठिकाणी पावसाचा इशारा आहे.
येलो अर्लट : मराठवाड्यात तूरळक ठिकाणी साधरण पावसाचा इशारा आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
