
India Meteorological Department : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अकरा जिल्ह्यात आज रात्री मध्यम प्रकाराचा पाऊस पडू शकतो. खास करुन मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम प्रकाराच्या सरी बरसतील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्या पावसासाठी पोषक वातावरण नसून बहूतांश भागात पावसाने दडी मारली आहे. सप्टेंबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार तसेच पावसाचा जोर हि वाढणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान अंदाज | India Meteorological Department
प्रमुख हवामान अभ्यासक अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या अंदाजनुसार, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड पुढील 24 तासात हलका ते मध्यम प्रकारच्या पावसाची सुरुवात होणार आहे. भारतीय हवामान विभागाचे अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, राज्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पडत राहिल. पाच दिवसानंतर राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो. सर्वात महत्वाचे सप्टेंबर महिन्यात सुध्दा सरासर हा पाऊस कमीच आहे. यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण राहणार.
पावसाचा जोर वाढणार का ?
हवामान खात्यानुसार सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. म्हणजेच ८ सप्टेंबर पासून २१ सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा वाढणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतो.
