
IMD : मराठवाड्यात मोठी पावसाची तूट झाली आहे. पुरेसा पाऊस होत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. हवामान खात्यानुसार २४ सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यात पावसाची चिंता मिटण्याची शक्यता आहे.
पुढील ३ दिवस पावसाचा इशारा | Weather Update Today
मराठवाड विभागात ४८ लाख हेक्टर वर पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक सोयाबीनची लागवड पाहयला मिळत आहे. सोयाबीनची लागवड ५३.२ टक्के पर्यंत आहे. उर्वरित क्षेत्र कापूस, तूर, बाजरी आणि मकाचे पिके आहेत. अनेक विविध ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली तसेच अनेक शेतकऱ्यांचे पिके जळून गेली आहेत.
Panjab Dakh : 21 तारखेपासून राज्यात पावसाची सुरुवात होणार
कृषी तज्ज्ञांच्या मते, राज्यात यावर्षी पिकांचे उत्पादन दुप्पटीने कमी होणार आहे. सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते परंतू यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे ग्रामीण भागात अर्थकारणार वर परिणाम होऊ शकतो. नांदेड, हिंगोली आणि लातूर तसेच उर्वरित काही जिल्ह्यांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण होत आहे.
Cotton Rate : कापसाला चांगला भाव मिळण्यास सुरुवात
हवामान खात्यानुसार, मागील आठवड्यात तीन दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तसेच २४ सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो. प्रादेशिक हवामान विभागान दिलेल्या अंदाजनुसार, हिंगोली, नांदेड तसेच परभणी या परिसरात पुढील २४ तासा नंतर पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच २३ सप्टेंबर पर्यंत बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
PM vishwakarma Yojana : 1 लाख रुपये पर्यंत बिनव्याज कर्ज | लगेच अर्ज करा
बंगालच्या उपसागरात चक्रवात तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात याचा परिणाम होईल तसेच पुढील काही दिवस अपेक्षित पाऊस पडू शकतो.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर तुम्ही सामील व्हा.
