India Meteorological Department : या वर्षी पावसाने दगा दिला असल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण भारतात ३२ टक्के पाऊस कमी पडला आहे. पुढील चार दिवस २५ राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे.
भारतीय हवामान विभाग | Forecast Rainfall
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाने मोठा ब्रेक घेताला आहे. बाकीच्या राज्यात आधीपासून जोरदार पाऊस पडलेला आहे. यापाठीमागचे कारण म्हणजे एल निनोचा प्रभाव होय. ऑगस्ट महिन्यात बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडलेला नाही.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या पाठोपाठ सप्टेंबर महिन्यातही सरासर पाऊस हा कमी राहणार आहे. दिल्ली तसेच हरियाणा मध्ये आधीच पूरस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल तीन वर्षानंतर राज्यात सर्वात कोरडा हवामान ठरला आहे. ऑगस्ट महिन्यात ३२ टक्के तर पावसाळ्यात ७ टक्के पाऊस कमी पडला आहे.
३० सप्टेंबर महिन्यात बहूतांश भागात सरासर पाऊस हा कमी पडणार आहे. हवामान खात्यानुसार राज्यात ३६ पैकी ३२ हंगामी उपविभागांमध्ये ९४ टक्के पेक्षा जास्त सरासर पाऊस कमी असणार आहे. बिहार, मध्य प्रदेश, केरळ, झारखंड, कर्नाटक, छत्तीसगड तसेच महाराष्ट्रात सुध्दा पाऊस कमी पडला आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
.