India Meteorological Department : देशातील काही राज्यांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. हिवाळ्यातील पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी हवामानाचे संकट कधी संपणार हा बळीराजाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर देशातील 31 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
आज रात्री पाऊस पडणार का ? | India Meteorological Department
स्कायमेटच्या अंदाजानुसार शुक्रवार आणि शनिवारी महाराष्ट्राच्या काही भागात हलका पाऊस पडेल. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील तापमानातही घट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन, खंडवा, झाबुआ, इंदूर, धार, बुरहानपूर, बरवानी, अलीराजपूर, नीमच, मंदसौर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
यासोबतच रतलाम, शाजापूर, आगर-माळवा, देवास, उज्जैन, अशोकनगर, दतिया, गुना, शिवपुरी, ग्वाल्हेर. विदिशा, सीहोर, राजगढ, रायसेन, भोपाळ, नर्मदापुरम, हरदा आणि बैतुलमध्ये वादळासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
तर पंजाब, हरियाणा, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये दाट धुके अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.