India Meteorological Department : पुढील 6 तासात आज रात्री 10 जिल्ह्यांत धुवांधार पाऊस

India Meteorological Department : पुढील 6 तासात आज रात्री 10 जिल्ह्यांत धुवांधार पाऊस
India Meteorological Department : पुढील 6 तासात आज रात्री 10 जिल्ह्यांत धुवांधार पाऊस

 

India Meteorological Department : मागील ५ ते ६ दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे अनेक शहरात आणि गावात सुध्दा नदी नाल्यांना पूर आलेला आहे. अशातच मुंबई आणि ठाणे मध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पुढील ६ तासात आज रात्री १० जिल्ह्यात जोरदार पावसाची सुरुवात होईल परंतू १० पैकी ४ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस होईल.

भारतीय हवामान विभाग | India Meteorological Department

महाराष्ट्रात सगळीकडे मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे. मुंबई, ठाणे, सातारा, सांगली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. कोकण पट्टी, विदर्भ आणि मराठवाड्यात आज धो धो पाऊस पडणार आहे. पुढील दोन तासात ४ जिल्ह्यांत वीजाच्या कडकडाटसह पावसाचा इशारा आहे. तसेच पुढील ४ जिल्ह्यांना रेड अर्लट भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

आयएमडी नुसार रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, या चार जिल्ह्यांत पुढील काही तासात अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार आहे. पालघर, ठाणे, लातूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड या सर्व जिल्ह्यात भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे त्यामुळे हवामान खात्याने १० जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट जारी केला आहे.

जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पाऊस हा थैमान घालत आहे मात्र आँगस्ट महिन्यात पावसाची विश्रांती अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. तसेच सोमवार ( 1 ऑगस्ट ) पर्यंत महाराष्ट्रात भाग बदलत जोरदार पावसाची हजेरी कायम असणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Maharashtra Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तयार | महाराष्ट्रात 5 दिवस पावसाचा इशारा
Maharashtra Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तयार | महाराष्ट्रात 5 दिवस पावसाचा इशारा

Leave a Comment