India Meteorological Department : हवामान खात्याने गुरुवारी जाहिर केलेल्या हवामान अंदाजनुसार पुढील दोन आठवड्यात देशात पावसाचा जोर कमी होणार आहे.
भारतीय हवामान विभाग | India Meteorological Department
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १७ ऑगस्ट रोजी मुंबई मध्ये मध्यम प्रकाराचा पाऊस पडला आहे. तसेच आज पूर्व विदर्भात पावसाची सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज १८ ऑगस्ट पासून २४ ऑगस्ट पर्यंत मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार आहे.
19 ऑगस्ट रोजी या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार
महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होईल परंतू बहूतांश भागात पावसाचा जोर कमी पाहयला मिळू शकतो. हवामान खात्यानुसार, तूरळक भाग सोडता कोकणात तसेच विदर्भात आणि मराठवाड्यात २४ ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कमी राहणार आहे. २५ ऑगस्ट पासून ३१ ऑगस्ट पर्यंत भारतात पावसाचा जोर कमी राहिल तसेच दक्षिण कोकणात या कालवधीत पावसाचा जोर वाढणार आहे.
१९ ऑगस्ट पासून ते २४ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस होईल तसेच उर्वरित भागात पाऊस पडेल पण पावसाचा जोर कमी राहिल. २५ ऑगस्ट पासून ३१ ऑगस्ट पर्यंत दक्षिण कोकण भाग सोडता, राज्यातील उर्वरित भागात पावसाचे प्रमाण कमी राहिल असा अंदाज भारतीय हवामान विभागने वर्तवला आहे.