India Meteorological Department : उद्याचे हवामान | 26 जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

India Meteorological Department : उद्याचे हवामान | 26 जिल्ह्यांत मुसळधार पाऊस
India Meteorological Department : उद्याचे हवामान | 26 जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

 

Maharashtra Rain : मागील काही दिवसापासून भाग बदलत महाराष्ट्रात पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवन दान मिळाले आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात एक ते दीड महिन्यापासून पुरेसा पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतू मागील दोन दिवसापासून अनेक भागात भाग बदलत राज्यात पावसाची सुरुवात झाली आहे.

उद्याचे हवामान अंदाज | Maharashtra Rain

भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. खास करुन विदर्भ, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे.

विदर्भ : वाशिम यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती, गडचिरोली, नागपूर, अकोला, वर्धा तब्बल ११ जिल्ह्यात तूरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडणार तसेच उर्वरित भागात हलका किंवा मध्यम प्रकाराचा पाऊस होत राहिल.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना बहूतांश भागात पावसाचा इशारा जारी केला आहे.

पश्चिम महाराष्ट्र : हवामान खात्यानुसार, सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर या जिल्ह्यात अनेक ठिकणी पावसाचा जोर वाढणार तसेच उर्वरित भागात हलका ते मध्यम प्रकाराचा पाऊस होत राहणार आहे.

कोकण : रत्नागिरी मध्ये आज बहूतांश भागात अतिवृष्टी सारखा पाऊस पडू शकतो. तसेच पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यात बहूतांश भागात पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

India Meteorological Department : पुढील 3 तासात 6 जिल्ह्यात भंयकर पाऊस पडणार
India Meteorological Department : पुढील 3 तासात 6 जिल्ह्यात भंयकर पाऊस पडणार

Leave a Comment