India Meteorological Department : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण भागात अगोदरच ७५ टक्के पाऊस झालेला आहे. यामुळे कोकण भागात पुढील महिन्यात पावसाची मोठी तूट राहण्याची शक्यता आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यासह विदर्भातील बहूतांश भागात पाऊस पडलेला नाही.
याच कारणांमुळे महाराष्ट्रातील बहूतांश भागात पिके सुकून चालली आहेत. अनेक जिल्ह्यात सुरुवातीपासून पावसाची कमतरात असल्यामुळे भविष्यात टंचाई भासणार आहे. तसेच पिकांना पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई तसेच पाणी टंचाई च्या समस्या वर लवकरात लवकर उपाय योजना करायला पाहिजे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात बहूतांश भागात पावसाने हजेरी लावलेली नाही. परंतू सप्टेंबर महिन्यात बहूतांश ठिकाणी पाऊस पडेल पण सरासर पाऊस हा महाराष्ट्रात कमी असणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण भागात अगोदरच ७५ टक्के पाऊस पडलेला आहे. याच कारणामुळे सप्टेंबर महिन्यात कोकण भागात पावसाची मोठी तूट राहण्याची शक्यता आहे.