
India Mteorological Department : भारतीय हवामान विभागाने पुढील १० ते १२ दिवसाचा हवामान अंदाज जारी केला आहे. हवामान खात्यानुसार पुढील काही दिवस अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे.
भारतीय हवामान विभाग | India Mteorological Department
मागील दोन दिवसात राज्यातील बहूतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात असल्यामुळे पुढील पाच दिवस सतत पाऊस होत राहणार आहे. रायगड, पालघर, रत्नागिरी मध्ये भाग बदलत बहूतांश पुढील 5 दिवस पाऊस होत राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे मध्ये सुध्दा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भात आणि मरावाड्यात तूरळक ठिकाणी पाऊस होत राहणार आहे. १३ ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कमी असेल पंरतू १४ ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होईल.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

नक्की होणार का मुसळधार पाऊस