Indian Meteorological Department : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भागात आज बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आहे. 12 नोव्हेंबर रोजी नगर, सातारा, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यात तूरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस झाल्याने भात पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. चिपळूण आणि सातारा या ठिकाणी मागील दोन दिवस पावसाने हजेरी लावली होती.
Weather Update : उद्याचे हवामान अंदाज | 14 नोव्हेंबर 2023
१२ नोव्हेंबर रोजी पश्चिम भागात तसेच पुणे नाशिक नगर राहुरी पाथर्डी नेवासा अकोला या क्षेत्रात बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळालेली आहे तसेच तूरळक ठिकाणी हलका पाऊस सुद्धा पडला होता.
15 नोव्हेंबर पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होणार
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 नोव्हेंबर पर्यंत बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो. यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात या क्षेत्रात मध्यम ते हलका पाऊस पावसाचे संकेत आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.