Kapsache Bhav Maharashtra : महाराष्ट्रातील कापसाचे भाव २०२३, कापसाचे भाव वाढणार २०२३

Kapsache Bhav Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्रात कापसाचे भाव हे कमी असल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये निराशा निर्माण झाली आहे. जांणकरांच्या मते, मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी कापसाला चांगल्याप्रकारे भाव मिळण्याची जास्त आहे. 

Kapsache Bhav Maharashtra, cotton
Kapsache Bhav Maharashtra

महाराष्ट्रातील कापसाचे भाव २०२३ ( Kapsache Bhav Maharashtra )

मागील वर्षी भारतात कापसाची लागवड कमी होती तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी हि वाढली होती. यावर्षी भारतात कापसाची लागवड हि ६ टक्कांनी वाढली पण अतिवृष्टी, बोंडआळीचा प्रादभार्वमुळे कापसाचे उत्पादन हे कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी कापसाचा वापर ३० टक्कांनी वाढला तसेच यंदाही चांगल्याप्रकारे कापसाचा वापर वाढणार. जांणकरांच्या मते यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी असणार कारण पाकिस्तान मध्ये दुष्काळ असल्याने कापसाचे दर वाढले. 

रोज कापसाचे भाव पाहण्यासाठी WhatApp Group जॉईन व्हा

आजचे कापसाचे भाव 

चीन मध्ये कोरोनामुळे मंद गतीन व्यापार चालू होते पण सध्या परिस्थिती सुधारत असल्यामुळे तेथून सुध्दा लवकरच कापसाची मागणी वाढणार. काही जाणंकारांच्या मते भारतात कापसाचे दर दबावत आणत असल्यामुळे कापसाचे भाव हे स्थिर राहत नाही. महाराष्ट्रात सरासरी कापसाला भाव हा ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० प्रति क्विंटल पर्यंत मिळत आहे. पण सध्या महाराष्ट्रातील शेतकरी बाजार भावाचा आढाव घेत असल्यामुळे कमी भावात कापूस विकण्यास शेतकरी पाठ फिरवत आहे.

कापसाचे भाव वाढणार २०२३

भारतात कापसाचे उत्पादन सीएआयच्या मते, प्रथम अंदाज ३७५ लाख गाठीचा, ऑक्टोबर मधील दुसरा अंदाज ३४३ लाख गाठीचा आणि ताजा अंदाज ३३९ लाख गाठीचा सांगण्यात आला आहे. मागील वर्षी ११२ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होती तसेच यावर्षी ११८ लाख हेक्टर वर कापसाची लागवड झालेली आहे. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा या राज्यात यावर्षी कापसाची लागवड वाढलेली आहे आणि पंजाब, हरियाना या राज्यात कमी कापसाची लागवड झाली आहे.

देशात कापसाचे उत्पादन कमी असून सुध्दा कापसाचे भाव हे जवळपास ७०० ते ५०० रुपयांनी कमी जास्त होत आहे. जांणकरांच्या मते, बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात सुधारणा हि शेवटच्या आठवड्यात पाहयला मिळणार, पण कापसाला साधरण पणे ८ हजार ५०० ते ९ हजार पर्यंत दर मिळेल. काही लोक कापसाचे भाव वाढू नये यासाठी दबाव आणत आहेत तसेच काही खोट्या बातम्या सुध्दा पसरवत आहे.

Leave a Comment