Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही, त्यामुळे अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड योजनेपासून वचिंत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी तसेच शेती योजनेपासून वचिंत राहू नये यासाठी राज्य सरकार आणि केंद्र विविध योजना राबवतात.
Kisan Credit Card योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वात आधी कागदपत्राचे पुरावे तसेच फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याज दरात कर्ज सुध्दा मिळू शकणार आहे.
Kisan Credit Card लागणारे कागदपत्रे
1 ) ओळख पत्र ( मतदान कार्ड ), पॅन कार्ड | आधार कार्ड हे बंधनकारक आहे.
2 ) फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती तसेच पत्ता देणे आवश्यक आहे.
Kisan Credit Card शेतकऱ्यांना लाभ आणि तोटे
1 ) किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याज दरात १ लाख ६० हजार पर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.
2 ) वेळे वर कर्ज नाही फेडता आले तर व्याज दर वाढवण्यात येणार आहे.
3 ) किसान क्रेडिट कार्डच्या खात्यावर पैसे असतील तर त्यास व्याज मिळणार
4 ) एटीएम कार्ड हे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत मोफत देण्यात येणार आहे.
5 ) कमी वेळेत शेतकऱ्यांनकडून व्याज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वर्षात ३ टक्के पर्यंत सूट मिळणार आहे.
Kisan Credit Card अर्ज कुठे करावा ?
अनेक शेतकऱ्यांना याबाबत माहिती नसल्यामुळे किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्ज कुठे करावा ? या बाबत माहिती सविस्तर खाली वाचा
1 ) PM Kisan केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जावे.
2 ) KCC या पर्याय वर जाऊन एक फॉर्मची झेरॉक्स प्रत कढावी.
3 ) संपूर्ण माहिती भरावी, लागणारे कागदपत्रे जोडवे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही आधी पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणे बंधनकारक आहे. ज्या बँकेत तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत पैसे जमा होतात अशाच बँकेत हा अर्ज सबमिट करावा.
शेतकरी असाल तर आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
Kisan