Live Cotton Market : भारतासह अमेरिका आणि पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे कापसाचे उत्पादन या देशात कमी झाले आहे. गेल्या तीन चार महिन्यापासून भारतात कापसाचे वाढत नसल्याने शेतकऱ्यांन मध्ये धीर सुटला त्यामुळे शेतकरी आता कापूस विकत आहे.
अमेरिका : या आठवड्यात अमेरिका मध्ये वायद्यां बाजारात कापसाचे भाव हे ५ टक्क्यांनी वाढले आहेत . म्हणजे ८० सेंट प्रतिपाऊंड वरुन थेट ८४ सेंट प्रतिपाऊंड पर्यंत वाढले होते.
पाकिस्तान : पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट आल्याने कापसाचे भाव हे स्थिर पाहयला मिळत आहे. ३७ किलो कापसाला २० हजार रुपये भाव सध्या भिकारी पाकिस्तान मध्ये चालू आहे.
चीन : चीन मध्ये कापडाला चांगलाच उठाव मिळल्यामुळे आंतराष्ट्रीय याचा परिणाम पाहयला मिळत आहे.
ब्राझील : ब्राझील मध्ये कापसाचे दर कमी पाहयला मिळाले आहे.
जांणकरांच्या मते, या आठवड्यात कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्यामुळे कापसाच्या भावात तेजी आली आहे.
गुजरात मध्ये ३८ हजार तर महाराष्ट्रात ३२ हजार, तेलंगणा ९ हजार, उत्तर भारतात ६ हजार कापसाची आवक पोहचली आहे. कापसाची आवक जास्त दिसत असली तरीही सगळीकडे सारखाच कापूस नाही.
कापूस वायद्यांमध्ये वाढ, Live Cotton Market
एमसीएक्स वरती कापसाच्या भावात शुक्रवारी ५ मे ला वायदे १८० रुपायांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या वायदे मध्ये सुधारणा होत असल्याने भारतात हि सुधारणा झालेली पाहयला मिळाली आहे. जांणकरांच्या मते, पुढील आठवड्यात सुध्दा आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुध्दा तेजी पाहयला मिळण्याची शक्यता आहे. पण आता जे भाव वाढले ते कमीच आहे.