Loan Waiver : नागपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने शेतीचे सर्वेक्षण करून त्यांना मदत करावी.
तसेच शेतकरी व कामगार संरक्षण दल युनियनने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून मदतीची रक्कम विनाविलंब माफ करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गहू, हरभरा, कापूस, मिरची, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले.
यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतीचा खर्चही भागवणे कठीण झाले आहे. कर्ज घेतल्यानंतर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर कुटुंबाचे उदरनिर्वाह करायचे की कर्ज फेडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना संघटनेचे अध्यक्ष राजनंद कावळे म्हणाले की, संकटावर मात करणे गरजेचे आहे. शासनाने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच कर्ज माफ करावे, अशी मागणी राजनंद कावळे व शिष्टमंडळाने केली आहे.