Lumpy skin dsease in cattle : नमस्कार शेतकरी मित्रानो, लम्पी स्किन ( lumpy skin ) या आजाराने या वर्षी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात लम्पी स्किनने थैमान घातले आहे. लम्पी स्किन हा आजार जास्त करुन गाईन वर आढळत आहे. लम्पी स्किन या आजारावरती अजून कोणताही ठोस उपचार सापडत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडत आहे. जो पर्यंत लम्पी स्किन ( lumpy skin ) वर ठोस उपचार सापडत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकाराची काळजी घेतली पाहीजे हे सविस्तर पुढे मांडले आहे.
लम्पी स्किन आजार कशामुळे होतो
- रक्त शोषणारे किडे उदा : डास, माश्या, चिलटे इत्यादी
- दूषित चारा आणि दूषित पाणी
- लम्पी स्किन हा आजारा कोराना सारखाच जनांरावरान मध्ये पसरत आहे.
लम्पी स्किन या आजाराचे लक्षणे
- भरपूर ताप
- डोळ्यातून चिकट पाणी निघणे
- नाकातून अति स्त्राव होणे
- भूक कमी होणे
- काही दिवसात चारा पाणी बंद करने
- दूध कमी होणे
- पायाला सूज येणे
- शरीराव मोठाले फोड येतात
अशा प्रकाराचे अनेक लक्षणे तुम्हाला आढळून दिसतील.
आतापर्यंत लम्पी स्किनवर कोणताही ठोस उपचार नसल्याने लोकांची चिंता वाढली आहे. जोपर्यंत लम्पी स्किनवर ठोस उपचार सापडत नाही तोपर्यंत घरगुती उपचार तुम्ही करू शकतात तसेच त्यासोबत तुम्ही डॉक्टरांना दाखवण्याचे गरज आहे.