Weather Update : २१ सप्टेंबर पासून मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भातील काही तूरळक ठिकाणी जोरदार पडला आहे. हवामान खात्यानुसार, २४ सप्टेंबर पर्यंत विविध ठिकाणी पाऊस होत राहिल परंतू २५ सप्टेंबर पासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढेल.
Health Tips : थंड अन्नाचं सेवन केल्याने शरीरासाठी घातक
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत ९ टक्के इतकी पावसाची तूट झालेली आहे. सर्वाधिक तूट मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पाहयला मिळत आहे. हवामान खात्यानुसार, मध्य महाराष्ट्रात २० टक्के, तर मराठवाड्यात २४ टक्के इतकी पावसाची तूट पाहयला मिळत आहे.
हवामान अंदाज | India Meteorological Department
राज्यात सप्टेंबरच्या तीसऱ्या आठवड्यात राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार होऊ शकतो. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस होईल तसेच अनेक ठिकाणी अतिवृष्टी सुध्दा होण्याची शक्यता आहे.
Cotton Rate : कापसाला चांगला भाव मिळण्यास सुरुवात
भारतीय हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर पासून ते ५ ऑगस्ट पर्यंत मध्य भारतात सर्वाधिक पाऊस होईल. तसेच उर्वरित भागात मध्यम प्रकारचा पाऊस होत राहणार आहे. तसेच ५ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर पर्यंत दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा इशारा जारी केला आहे. १२ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात राज्यात जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
हवामान खात्यानुसार, २३ सप्टेंबर पासून बहूतांश भागात मध्यम प्रकारचा पाऊस होईल तसेच तूरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस सुध्दा पाडू शकतो. तसेच कोकण विभागातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पडणार आहे.
Marathwada : मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार ?
पुढील ४८ तासानंतर राज्यात कोकण विभागात तसेच नगर, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे, धुळे या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो तसेच उर्वरित भागात मध्यम प्रकाराचा पाऊस होऊ शकतो. आणि हवामान खात्याने राज्यातील उर्वरित भागातील अनेक जिल्ह्यात मध्यम प्रकारचा पाऊस पडत राहिल.