
Vidarbha : महाराष्ट्रात गेल्या १५ दिवसापासून कुठेहि मुसळधार पाऊस पडलेला नाही. परंतू आज भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार, कोकणात आणि विदर्भात जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. विदर्भात आज तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार परंतू उर्वरित भागात आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे.
भारतीय हवामान विभाग | India Meteorological Department
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात फिरोजी पासून पूर्व मध्य बंगालपर्यंत उपसागरात कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. आसाम आणि तामिळनाडू मधील कोमोरिन मध्ये सध्याच्या परिस्थितीत मान्सून सक्रीय आहे. राज्यात कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक उन पडत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील तूरळक ठिकाणी मध्य स्वरुपाचा पाऊस पडत आहे. आज रात्री विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकणात मात्र तूरळक ठिकाणी मुसळधार होईल तसेच उर्वरित भागात हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहणार आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
