Maharashtra Rain : आज हवामान खात्याचा जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra Rain : आज हवामान खात्याचा जोरदार पावसाचा इशारा
Maharashtra Rain : आज हवामान खात्याचा जोरदार पावसाचा इशारा

 

India Meteorological Department : मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात पावसानं उघडीप चित्र पाहयला मिळत आहे. राज्यातील तूरळक भागात हलका पाऊस पडत आहे. खरीप हगांमातील पिकांना जगवण्यासाठी पावसाची अत्यंत गरज आहे. पाण्याची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना धोका पोहचला आहे.

महाराष्ट्रातून पाऊस गायब झाल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात पडला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला आहे.

Imd ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे या भागातील अनेक जिल्ह्यात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच मुंबईसह कोकणात सुध्दा आज पावसाची हजेरी लागणार आहे.

कोकणात आज मुसळधार पाऊस होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने दिले आहे. पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे, पाणी टंचाई कमी भासावी. यासाठी पावसाची गरज आहे.

राज्यात पावसाचा मोठा खंडा

महाराष्ट्रात मान्सून मोठ्या कालावधी नंतर राज्यात दाखल झाला. जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात अनेक भागात पाऊस पडला. त्यांनतर जुलै महिन्यात अनेक भागात थोडाफार पाऊस पडलेला आहे. ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेला यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हानी पोहचली आहे.

४५३ महसूल मध्ये २१ दिवस तर ६१३ महसूल मध्ये १५ ते २१ दिवस पावसाचा खंड असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची कमतरता असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रातील बहूतांश भागात गावात अजूनहि मुसळधार पाऊस न पडल्याने विहिरी होण्याच्या मार्गावर आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.

एल निनोचा प्रभाव जाणवतो

एल निनोचा प्रभाव महाराष्ट्राच्या मान्सून वर झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात तयार झालेल्या एल निनोने महाराष्ट्रातील हवामान वर परिणाम केला आहे. एल निनोच्या प्रभावमुळे भारतातील अनेक राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. राज्यातील अनेक भागात कडक उन पडत परंतू हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला पण राज्यात असे वातावरण पाहयला मिळत नाही.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Weather Update : उद्याचे हवामान अंदाज | राज्यात पावसाची सुरुवात
Weather Update : उद्याचे हवामान अंदाज | राज्यात पावसाची सुरुवात

Leave a Comment