Maharashtra Rain : कोकण भाग, विदर्भ, मराठवाड्यात तसेच उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. अनेक गावात पूर आल्याने तसेच शहरात पाणी शिरल्याने जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर मध्ये आज पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
आज कोणत्या भागात पाऊस पडणार ? | Maharashtra Rain
कोकणात आणि विदर्भात आज पासून पावसाचा जोर वाढत जाणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी ऑरेंज अर्लट तर मराठवाड्यासाठी येलो अर्लट हवामान खात्याने जारी केला आहे. कोकण भागात आज रायगड, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, गोंदिया, जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अर्लट जारी केला आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा प्रगती करत वायव्य दिशेने सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही मुसळधार पाऊस पडत राहणार आहे. यामुळे राज्यातील बहूतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस पडत राहणा आहे.