
IMD Alert : गेल्या काही दिवसापासून राज्यातील बहूतांश भागात कडक उन पडत आहे. आज पासून राज्यात पावसाची सुरुवात होईल. हवामान खात्यानुसार आज राज्यात हलका पाऊस तूरळक ठिकाणी पडेल. तसेच ३ सप्टेंबर रोजी राज्यात सर्वदूर पाऊस होईल परंतू पावसाला अधिक नसणार.
आज पाऊस पडेल का ?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाची सुरुवात होईल.
येलो अर्लट : गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव तसेच लातूर मध्ये पावसाचा जोर वाढेल तसेच अनेक ठिकाणी मेघगर्जनासह पावसाचा इशारा आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला आहे. गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा विदर्भातील या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला आहे.
हा पाऊस सर्वत्र पडणार नाही परंतू हा पाऊस भाग बदलत होत राहिल. तसेच पावसाचा जोर वाढणार असून पुढील काही शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
