Maharashtra Rain : अचानक वातावरणात बदल | गारपीटीचा इशारा

Maharashtra Rain अचानक वातावरणात बदल गारपीटीचा इशारा
Maharashtra Rain अचानक वातावरणात बदल गारपीटीचा इशारा

 

Maharashtra Rain : सध्या राज्यात उष्मा, पाऊस आणि दुष्काळ अशी परिस्थिती आहे. पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
सोलापूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात आज काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. नांदेड, धाराशिव, लातूर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

विदर्भातील यवतमाळ आणि अमरावतीमध्ये उद्या म्हणजेच रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी तसेच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यासोबतच खान्देशसह नाशिक, पुणे, सातारा, सांगली परिसरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याने सोमवारी विदर्भातील वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील इतर जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा, नगर, सोलापूर आणि मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसासाठी हवामान विभागाने पिवळा इशारा जारी केला आहे.

मंगळवारी चंद्रपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Drought Fund केवायसी पूर्ण नसल्यास, निधी मिळणार नाही
Drought Fund केवायसी पूर्ण नसल्यास, निधी मिळणार नाही

Leave a Comment