Maharashtra Monsoon Update Today : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन झाल्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. ज्या परिसरात पाऊस झाला अशा ठिकाणी शेतीच्या कामाला वेग आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे.
आज पाऊस पडणार का ? |
महाराष्ट्रातील आज विविध जिल्ह्यात पाऊस झाला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी वातावरण पाहूनच काळजी पूर्वक बाहेर पडावे. असे आवाहन हवामान खात्याने नारिकांना दिले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज २३ जिल्ह्यांना येलो अर्लट जारी केला आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा हलका प्रकारचा पाऊस सुध्दा होऊ शकतो. पुढील २३ जिल्हे वाचा.
आज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, जळगाव, बुलढाणा, परभणी, जालना, नांदेड, धुळे, नंदूरबार, पालघर, ठाणे, लातूर, रायगड, वरील जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अर्लट जारी केला आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढेल तसेच उर्वरित भागात हलक्या प्रकारचा पाऊस सुध्दा पडू शकतो.
पुढील काही तासात पाऊस पडणार का ?
पुणे आणि सातारा मध्ये आज पुढील दोन ते तीन तासात मध्यम ते हलक्या प्रकारचा पाऊस पडू शकतो. अनेक ठिकाणी अजूनहि पाऊस झालेला नाही परंतू पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला व त्या परिसरात लवकरच चक्रीय वादळ सक्रीय होणार आहे. त्यामुळे राज्यात अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
नंदूरबार, धुळे, नाशिक, नांदेड, जालना आणि हिंगोली या सहा जिल्ह्यात हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पुढील काही तासात होणार आहे. तसेच अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे नागरिकांनी अंदाज लक्षात घेऊनच बाहेर पडावे.