
Maharashtra Rain Alert : मागील ४ ते ५ दिवसापासून राज्यात पावसाने अनेक भागात थैमान घातले आहे. मुंबई सारख्या शहरात पाणी साचल्याणे वाहूतिक वर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी सतत मुसळधार पाऊस होत असल्यामुळे नागरिकांना धोका सुध्दा निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) हवामान अंदाज जारी केल्यानुसार राज्यात पुढील २४ तासात अस्मानी संकट येण्याची शक्यता आहे.
आज पाऊस पडणार आहे का ? | Maharashtra Rain Alert
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात २५ जुलै पर्यंत पावसाचा अधिक जाेर पाहयला मिळणार आहे. तसेच पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र, कोकण भाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकण आणि पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर या भागात पुढील २४ तासात जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच ठाणे आणि रायगड या भागात पुढील ३ ते ४ चार तासात अति मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
नागरिकांना महत्वाची सूचना
अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे नागरिकांनी बाहेर फिरण्याचे टाळावे. तसेच जोरदार पाऊस सुरु असल्यास कोणत्याही झाडा खाली थांबू नये. जर डोंगर भागात जोरदार पाऊस होत असेल तर सुरक्षित ठिकाणी जावे, सध्याच्या परिस्थितीत डोंगर भागात दरड कोसळण्याच्या घटना होत आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
