
Weather Update : आज हवामान खात्याने मुंबईसह ठाणे आणि पालघर या परिसरात पावसाचा इशारा जारी केला. १८ सप्टेंबर पर्यंत मुंबई मध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र वाढले असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात आज रात्रीतून पावसाचा जोर वाढणार आहे.
आज रात्री पाऊस पडणार का ?
होय, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, ठाणे आणि पालघर मध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस पडेल तसेच जनजवीन हे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, वाशीम, अकोला, नाशिक, पुणे, नंदूरबार, जळगाव, रायगड, धुळे या दहा जिल्ह्यात बहूतांश भागात आज मेघगर्जनासह पाऊस पडेल तसेच तूरळक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस होऊ शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र वाढत असल्यामुळे पावसाचा जोर हा अधिक होऊ शकतो.
Health Tips : थंड अन्नाचं सेवन केल्याने शरीरासाठी घातक
Vehicle Insurance : विम्याशिवाय वाहन चालवल्यास मोठी कारवाई होणार
उद्याचे हवामान अंदाज | India Meteorological Department
उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना आज आणि उद्या ऑरेंज अर्लट जारी केला आहे. उत्तर कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खाऱ्याने वर्तवला आहे.
हवामान अंदाज : Whatsapp Group वर आताच सामील व्हा.
