Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील अनेक भागात अजुनहि पेरण्या झाल्या नाहित, यामुळे बळीराजा हा चिंतेत पडला आहे. परंतू हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ४८ तासात राज्यातील काही भागात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. हवामान खात्यानुसार मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र वगळता उर्वरित भागातील शेतकरी मुसळधार पावसाची प्रतिक्षा पाहत आहे.
गुजरात आणि केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ६ जुलै रोजी राज्यात अति मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मुंबई आणि ठाणे संपूर्ण भागात तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील भागात तूरळक ठिकाणी अति तीव्र पाऊस होणार आहे.
३ जुलै पासून राज्यातील काही भागात मान्सून चांगल्याप्रकारे सक्रीय झाल्यापासून राज्यातील काही भागात ४८ तासात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
आज पाऊस पडेल का ? | Maharashtra Rain Update
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नागपूर, वर्धा, चंद्रपुर, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, सातारा, नाशिक, पालघर, नाशिक, पुणे या सोळा जिल्ह्यात आज ७ जुलै पर्यंत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड आणि रत्नागिरी मध्ये आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल.