Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यात पावसाची सुरुवात झाली परंतू तूरळक ठिकाणी हलक्या प्रकाराचा पाऊस होत आहे. बहूतांश भागात पावसाची सुरुवात कधी होणार तसेच पावसाचा जोर वाढणार की नाही ? असे प्रशन उपस्थिती होत आहे.
भारतीय हवामान विभागाने ( india meteorological department ) म्हटल्या प्रमाणे ऑगस्ट महिन्यात पावसाचा पावसाचे कमी राहिले आहे. तसेच २१ ऑगस्ट पासून ते ३० ऑगस्ट पर्यंत पाऊस होणार परंतू बहूतांश भागात हलक्या प्रकराचा पाऊस होणार. तूरळक ठिकाणी तीव्र प्रकारचा पाऊस होऊ शकतो.
हवामान अभ्यासक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाड्यात आणि विदर्भात पुढील ३ ते ४ तासात पावसाच्या सरी बरसणार आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने ( india meteorological department ) वर्तवला आहे. मराठवाड्यात आणि विदर्भातील शेतकऱ्यांनसाठी दिलासा दायक बातमी आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यात पुढील चार दिवस अश्याच प्रकारे पाऊस होत राहणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अर्लट जारी केला आहे. जळगावसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना येलो अर्लट दिला आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.