Maharashtra Rain Update Today : महाराष्ट्रात विदर्भात, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात अनुकूल वातावरण असल्यामुळे ९ जुलै पर्यंत समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळबंल्या आहेत. सत्य परिस्थिती पाहता, अनेक शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीची वेळ येणार अशी भिती निर्माण झाली आहे.
मराठवाड्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील अनेक भागात आज जोरदार पाऊस होणार आहे. तसेच भारतीय हवामान विभागाच्या मते राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले, त्यामुळे आज २३ जिल्ह्यात भाग बदलत मेघगर्जना होणार आहे.
प्रादेशिक हवामान विभागाच्या मते, कोकण भागात अनेक ठिकाणी आज पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात भाग बदलत तूरळक ठिकाणी आज जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात आज अति मुसळधार होणार आहे.
आज कुठे पाऊस पडणार ? | Maharashtra Rain Update
पुणे, ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, रात्नागिरी, रायगड, कोल्हापूर या 7 जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, यवतमाळ, नागपूर, वाशीम, अमरावती, अकोला, बुलढाणा, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, बीड या १६ जिल्ह्यात तूरळक ठिकाणी आज ५ जुलै रोजी भाग बदलत जोरदार पाऊस होणार आहे.